सिंधुदुर्ग – कोल्हापूरचा रस्ता होणार सुस्साट ; २१ किमी लांबीच्या रस्त्याला सुमारे २४९ कोटीची मान्यता

सिंधुदुर्ग – कोल्हापूरचा रस्ता होणार सुस्साट ; २१ किमी लांबीच्या रस्त्याला सुमारे २४९ कोटीची मान्यता

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग – कोल्हापूरचा रस्ता होणार सुस्साट ; २१ किमी लांबीच्या रस्त्याला सुमारे २४९ कोटीची मान्यता*

*हजारो पर्यटक, प्रवाश्यांना होणार लाभ ; सा. बां. मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती*

*मुंबई :*

सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या एकूण २१ कि.मी लांबीच्या रस्त्याच्या क्रॉंकिटकरण व दुपदरीकरणाच्या कामांस आज मान्यता मिळाली आहे. केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या कामांच्या रु. २४९.१३ कोटीच्या किंमतीस मान्यता दिल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. या रस्त्याच्या कामांच्या मान्यतेमुळे दररोज या मार्गावरुन प्रवास करणारे हजारो पर्यटक तसेच साखर कारखानदार यांना याचा ख-या अर्थाने लाभ मिळणार आहे.

यासंदर्भात बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, या रस्त्याच्या कामाच्या मान्यतेसाठी आमच्या विभागाकडून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. तसेच वेळोवेळी आवश्यक पत्र व्यवहार केंद्रीय रस्ते वाहतून मंत्रालयाकडे करण्यात येत होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री चव्हाण यांनी यांसदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले की, तळेरे गगनबावडा कोल्हापूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी कि.मी. ६/००० ते ११/००० आणि १९/३०० (करुळ घाट सुरु) ते ३५/३०० (गगनबावडा) च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६.५० कि.मी. व कोल्हापूर जिल्हातील ४.५० कि.मी. अशा एकूण २१ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पध्दतीने दुपदरी करणे या कामाच्या रु. २४९.१३ कोटी किंमतीच्या कामास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय, दिल्ली येथील स्टँडीग फायनान्स समितीने आजच्या बैठकीत मान्यता दिली आहे.
सदरहू राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी हा सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग असुन मुख्यत्वे करुन साखर कारखानदारी व पर्यटनाच्या दृष्टीने या रस्त्याचे महत्व आहे. सदर रस्त्यावर करुळ घाट असुन येथे पडणाऱ्या ४००० ते ५००० मी.मी. पावसामुळे करुळ घाटाची अस्तित्वातील १० कि.मी. डांबरी रस्त्याची लांबी पावसाळ्यात वारंवार खराब होऊन वाहतूकीस अडथळे येत होते असे सांगताना मंत्री चव्हाण म्हणाले की, सदर १० कि.मी. घाट लांबीमध्ये काँक्रिटीकरण पध्दतीने दुपदरी ७ मी. रुंदीचा काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात येणार असुन उर्वरीत – ११ कि.मी. लांबीमध्ये काँक्रिटीकरण पध्दतीने दुपदरी रस्ता + पेव्हड शोर्ल्डर्स असा एकूण १० मीटर रुंदीने काँक्रिटचा रस्ता तयार होणार आहे.यामुळे या मार्गावरुन दरदिवशी प्रवास करणा-या हजारो प्रवाश्यांना यांना लाभ मिळणार असेही चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!