*कोकण Express*
*विदर्भ-कोकण जोडणाऱ्या प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला शेगांव थांबा ४ जानेवारीपासून मंजुर*
*राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव सरचिटणीस वैभव बहुतूले यांच्या प्रयत्नाना यश*
*कोकणातून शेगांवला जाणाऱ्या गजानन महाराज भक्तांची मागणी पुर्ण*
शेगांव- विदर्भ कोकण जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागपूर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला ४ जानेवारीपासून थांबा देण्यात आला आहे कोकणातून शेगांवला जाणार्या भक्तांची मागणी या थांब्यामुळे पुर्ण झाली आहे
विदर्भातील शेगांव येथील गजानन महाराज संस्थानची विदर्भ पंढरी म्हणून ओळख आहे गजानन महाराज संस्थान कडुन देण्यात येणार्या सोयी-सुविधा,शिस्त,पारदर्शी कारभार यामुळे येथे भाविकांची सदैव गर्दी राहते.राज्याच्या विविध भागातून तसेच देशभरातून भाविक शेगांवला येतात.त्यात विदर्भ कोकण जोडणाऱ्या नागपूर मडगाव प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला ४ जानेवारीपासून शेगांव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे