आमच्या समस्या सोडवा, आ.नितेश राणे यांना अंगणवाडी कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

आमच्या समस्या सोडवा, आ.नितेश राणे यांना अंगणवाडी कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

*कोकण Express*

*आमच्या समस्या सोडवा, आ.नितेश राणे यांना अंगणवाडी कार्यकर्त्यांनी दिले निवेदन*

*देवगड ः प्रतिनिधी*

अंगणवाडी सेविकांच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा अशा आशयाचे निवेदन अंगणवाडी कर्मचारी सभेच्या कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांना देवगड येथे दिले

आमदार नितेश राणे यांनी हे निवेदन स्वीकारून आपण याप्रकरणी लक्ष घालत असल्याचे आश्वासन दिले आहे आणि व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की

आम्ही अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) या राज्यव्यापी संघटनेच्या सभासद आहोत,प्रचंड महागाई आहे. आमच्या तुटपुंज्या मानधनात आम्हांला घर सांभाळणे अवघड नव्हे, अशक्यच झाले आहे.२०१८ पासून गेली ५ वर्ष अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ झालीच नाही,कामांचा बोजा मात्र दररोज वाढत चालला आहे. आम्ही वेळोवेळी प्रकल्पापासून विधानसभेपर्यंत मोर्चे काढतो.

आश्वासनापलिकडे सरकार काहीच करत नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी असतांना महिला व बालविकास विभागाने पोषण ट्रॅकर नावाचा अॅप इंग्लिशमध्ये अंगणवाडीला सरकारने दिलेल्या मोबाईलमध्ये अपलोड करायला सांगितला आहे. २०१८ ला आम्हाला निकृष्ट दर्जाचे मोबाईल सरकारने दिले होते. त्यापैकी जादातर मोबाईल बिघडले आहेत. काहींवर ते अॅप डाऊनलोड होत नाहीत. आम्हांला इंग्लिश लिहीणे जमत नाही. परंतु स्थानिक अधिकारी मात्र खाजगी मोबाईल वापरा म्हणतात, धमक्या देतात आम्ही मानसेवी असतांना अपमानकारक बोलतात त्यामुळे महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचा-यांमध्ये सरकार विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे.

आपण आमचे आमदार म्हणून आमच्या खालील मागण्यांकडे लक्ष द्यावे व सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडावे ही नम्र विनंती. आमच्या मागण्या खालीलप्रमाणे
१) अंगणवाडी कर्मचा-यांना वेतनश्रेणी, बोनस, ग्रॅज्युईटी द्या. दरम्यानच्या कालावधीत किमान वेतन सेविकांना व मिनी सेविकांना १८००० रुपये, मदतनीसना १५००० रुपये दरमहा द्यावेत.
२) सेविकांना नवीन मोबाईल शासनाने द्यावेत.
३) पोषण ट्रॅकर पूर्ण मराठीत द्यावे.
उपोषण रोखण्यासाठी आहाराचे दर तिप्पट करावेत
अंगणवाडी रिक्त पदांची भरती तातडीने करावी हे निवेदन देतेवेळी
अंगणवाडी कर्मचारी सभेच्या पदाधिकारी सोनाली जाधव, अदिती केळकर, नयना मेस्त्री, शुभदा देसाई, अंकिता कावले, वैशाली जगताप उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!