*कोकण Express*
*आ. नितेश राणे यांनी केले अजित पवार यांच्या पुतळ्याचे कडेलोट आंदोलन*
*विजयदुर्ग प्रतिनिधी*
विरोधी पक्षनेते अजित पवार यांना धरणवीर ही पदवी मिळालेली आहे. त्याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बोलू नये, आज त्यांचा पुतळा विजयदुर्ग खाडी टाकून प्रतीकात्मक कडेलोट आंदोलन करीत आहोत. मात्र ते पुन्हा बोलले तर शिवप्रेमींचा संयम सुटेल असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
आमदार नितेश राणे यांनी विजयदुर्ग येथे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वक्तव्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले. त्यांच्या पुतळ्याचा प्रतीकात्मक कडेलोट करून हा पुतळा विजयदुर्ग खाडीत फेकला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचाही पुतळा फेकण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे, संदीप साटम, युवा सेलचे तालुकाध्यक्ष उत्तम बिरजे, देवगड शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी सभापती रवी पाळेकर, योगेश पाटकर, अरीफ बगदादी,मुफीत बगदादी देवगडच्या नगरसेविका तनवी चांदोसकर, माजी नगराध्यक्ष प्रणाली माने, भाजप विजयदुर्ग शक्ती केंद्र प्रमुख ग्रेसीस फर्नांडिस, बूथ प्रमुख निलेश मणचेकर, प्रभारी सरपंच रियाज काझी, ग्रामपंचायत सदस्य शुभा कदम, दिनेश जावकर, प्रतिक्षा मिठबावकर, पुर्वा लोंबर, वैशाली बांदकर तसेच पप्या मिठबावकर, दशरथ विनायक चोडणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर तीव्र टीका केली खासदार अमोल कोल्हे बोलतात म्हणून अथवा स्क्रिप्ट वाचतात म्हणून अजित पवार यांनी बोलू नये अजित पवार यांनी जरी किती म्हटले तरी आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यापासून कुणीही रोखू शकत नाही
शिवसेनेबद्दल बोलताना त्यांना आता कोणताही हिंदू धर्माचा अभिमान राहिला नसून छत्रपती संभाजी महाराजांबद्दल शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला अजित पवार अपमान कारक बोलत असताना राग येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात ठेवायचे कशाला असा प्रतिप्रश्न ही आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.