सीएसएमटी-कन्याकुमारीला खेडमध्ये थांबा न दिल्यास आंदोलनाचा इशारा

सीएसएमटी-कन्याकुमारीला खेडमध्ये थांबा न दिल्यास आंदोलनाचा इशारा

*कोकण Express*

*सीएसएमटी-कन्याकुमारीला खेडमध्ये थांबा न दिल्यास आंदोलनाचा इशारा*

कोकण मार्गावर जाहीर करण्यात आलेल्या सीएसएमटी मुंबई-कन्याकुमारी सुपरफास्ट स्पेशलला खेड स्थानकात थांबा देण्यास डावलण्यात आले आहे. या स्पेशल गाडीला येथील स्थानकात थांबा न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेने दिला आहे. तसे पत्रही कोकण रेल्वेच्या सीएमडी यांना देण्यात आले आहे. जल फाऊंडेशनकडून मागील चार वर्षापासून कोकण रेल्वेकडे कोकण विभागातील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने चार दिवसांपूर्वी कोकण मार्गावर जाहीर केलेल्या सीएसएमटी मुंबई-कन्याकुमारी एक्स्प्रेसला खेडला थांबा दिलेला नाही. परतीच्या प्रवासात ही स्पेशल रविवारी येत असल्यामुळे येथील स्थानकात थांबा दिल्यास सावंतवाडी-दिवा, मांडवी-लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्यांवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!