राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड

राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड

*कोकण Express*

*राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड*

*कनेडी हायस्कूलचा कॅरममधील दबदबा कायम*

*जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा कार्यकारी अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित केलेल्या विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. सदर स्पर्धा शिर्के प्रशाला रत्नागिरी येथे संपन्न झाली.*

*स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे -*

*१४ वर्षाखालील गट मुली -* *कुमारी श्रेया राजेंद्र महाडिक , पञ्चम क्रमांक, इयत्ता आठवी*

*१७ वर्षाखालील मुली -*
*कु. दीक्षा नंदकिशोर चव्हाण, प्रथम क्रमांक, इयत्ता ११वी सायन्स*

*सदर यशस्वी विद्यार्थिनींची डेरवण येथे होणाऱ्या विभागीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.*

यशस्वी विद्यार्थ्यांना क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सन्मा. श्री. सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती खजिनदार सन्मा. श्री. गणपत सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कु. श्रेया व दीक्षा हिस प्रशालेतील संस्कृत तथा इंग्रजी अध्यापक श्री. मकरंद आपटे, क्रीडा शिक्षक श्री. बयाजी बुराण व जिल्ह्यातील नामवंत कॅरम खेळाडू श्री. गौतम यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!