*कोकण Express*
*पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे मिळालेले प्रेम कदापि विसरणार नाही – मुख्याध्यापक प्रमोद लोके..*
*माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपीडचे मुख्याध्यापक प्रमोद लोके यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी- हडपीड (मुंबई) संचलित,माध्यमिक शिक्षण शाळा, कोळोशी- हडपीड यांच्यामुळे काम करण्याची मला संधी मिळाली.विज्ञान प्रदर्शन माध्यमातून राज्यभरात शाळेचे मॉडेल पोहचले आहे.माझ्यावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास टाकल्याने आम्ही शिक्षक अनेक विद्यार्थी घडवू शकलो.आम्ही पंचक्रोशीतील विद्यार्थी घडवण्याचे काम केलं.सेवानिवृत्ती होत असताना या संस्थेने खूप काही दिलं आहे.अनेक विद्यार्थी डॉक्टर,वकील,इंजिनियर ,वकील,स्पोर्ट्स, शिक्षक, उद्योजकआणि विविध क्षेत्रात चमकले आहेत.पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे मिळालेले प्रेम कदापि विसरणार नाही,असे भावोद्दगार सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद लोके यांनी काढले.
शिक्षण प्रसारक मंडळ कोळोशी- हडपीड (मुंबई) संचलित,माध्यमिक शिक्षण शाळा, कोळोशी- हडपीड ता. देवगड या शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद नामदेव लोके यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा कार्यक्रम अध्यक्ष चारुदास इंदप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी शाळा समिती अध्यक्ष किशोर राणे,कार्याध्यक्ष नारायण स. राणे,कार्यवाह सुरेश कृ. राणे, सदस्य श्री दाजी राणे कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर ,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे ,उपसरपंच सचिन परब , डॉ . चंद्रकांत पुरळकर , सोसायटी चेअरमन भगवान लोके,माजी चेअरमन प्रकाश परब,शंकर राणे , शिवाजी गुरव , दिनेश फाटक , रमेश कदम , राजकुमार लोके ,मुरलीधर लोके , सुभाष इंदप , पोलीस पाटील संजय गोरुले , शाळा समिती सदस्य संतोष चव्हाण , सुशील इंदप , छोटू खोत , नंदू कदम , लक्ष्मण लोके ,शत्रुघ्न डामरे, संजय डगरे,प्रदिप हरमलकर ,संतोष परब,विश्वनाथ कदम ,मनोहर चव्हाण , अतुल सदडेकर , तात्या निकम , दशरथ दहीबावकर , शरद गावकर,श्री. ऐनापुरे सर,सौ साटम मॅडम ,श्री टी डी कांबळे सर ,श्री. जाधव सर,श्री. पाताडे सर , श्री. कर्डे सर ,श्री सुतार सर,पाटील मॅडम,कदम मॅडम ,वाडकर मॅडम ,शिक्षक भारती अध्यक्ष श्री हेमंत सावंत , सागर फाळके ,श्री पारकर सर,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक नंदन घोगळे ,हनुमंत वाळके ,संजीव राऊत ,हिदायत अत्तार,नारायण माने ,संगीता राणे,मराठे मॅडम उपस्थित होते.यावेळी संस्था पदाधिकारी आणि शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती गर्जे मॅडम तर सूत्रसंचालन देसाई मॅडम यांनी केले.