निगुडे सरपंच समीर गावडे विकास कामाबाबत भूमिपूजन

निगुडे सरपंच समीर गावडे विकास कामाबाबत भूमिपूजन

*कोकण Express*

*निगुडे सरपंच समीर गावडे विकास कामाबाबत भूमिपूजन*

*बांदा ः  प्रतिनिधी*

निगुडे जाधववाडी रस्त्याचं डांबरीकरणाचं काम मंजूर झालं असून सदर रस्त्याचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून निगुडे सरपंच श्री समीर गावडे यांनी केले यावेळी आज सरपंच पदाचा कार्यकालचा शेवटचा दिवस असल्याने निगुडे गावातील विकास कामांना चालना देण्याचे काम सरपंच समीर गावडे यांनी केले यावेळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे नवनिर्वाचित सरपंच श्री लक्ष्मण निगुडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रताप गावडे, विठू गवंडे, ईशा तुळसकर, लक्ष्मी दळवी, वर्षा जाधव, समीक्षा गावडे, माजी सरपंच जयराम गवंडे, ग्रामसेविका तनवी गवस, तलाठी भाग्यश्री शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, ग्रामपंचायत सदस्य माजी वसंत जाधव, ग्रामस्थ विलास सावंत, चंद्रकांत जाधव, ठेकेदार दादा भाईप विश्राम जाधव, गुरुनाथ जाधव, किशोर जाधव, दत्ताराम जाधव आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच निगुडे मधली वाडी या ठिकाणी स्ट्रीट लाईट भूमिपूजन निगुडे सरपंच समीर गावडे यांच्या हस्ते पार पडलं गावाच्या विकासासाठी आम्ही नियमित कार्यरत राहू गाव विकासाच्या दृष्टीने नेण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू अशी ग्वाही सरपंच समीर गावडे यांनी दिले यावेळी शेवटच्या क्षणी दोन्ही कामे मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!