कळसुलीत वनविभागाच्या वतीने वनराई बंधारा घालण्यात आला

कळसुलीत वनविभागाच्या वतीने वनराई बंधारा घालण्यात आला

*कोकण Express*

*कळसुलीत वनविभागाच्या वतीने वनराई बंधारा घालण्यात आला*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

तालुक्यातील कळसुली गावात उप वनरक्षक सावंतवाडी वनक्षेत्रपाल कणकवली श्री.रा.ज.घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ दिगवळे मधील नियतक्षेत्र कळसुली वनराई बंधारा बांधण्यात आला.

कळसुली गावातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी व वन्य प्राण्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात पाणीटंचाई उद्भवुणे यासाठी कळसुली गावात वनराई बंधारा बांधण्यात आला असल्याची माहिती वनअधिकारी वनक्षेत्रपाल कणकवली श्री. घुणकीकर यांनी दिली.

यावेळी मा.वन परिमंडळ अधिकारी श्री.तानाजी दळवी ,वनपरिमंडळ अधिकारी प.घा.वी.श्री.शशिकांत साटम ,वनरक्षक कळसुली सुखदेव गळवे, वनरक्षक नरडवे प्रतीराज शिंदे ,वनमजूर कळसुली कृष्णा सुद्रिक, वनमजूर दिगवळे तुषार रासम, व स्थानिक ग्रामस्थ आनंद पार्टे, शंकर मुरकर आदीं उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!