वैश्य समाजाने, राजकीय, व्यापारी सामाजिक क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवला – संदेश पारकर

वैश्य समाजाने, राजकीय, व्यापारी सामाजिक क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवला – संदेश पारकर

*कोकण Express*

*वैश्य समाजाने, राजकीय, व्यापारी सामाजिक क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवला – संदेश पारकर*

*जिल्ह्यात वैशिष्ट्य समाजाची एक विशिष्ट ताकद..*

नांदगाव येथे वैश्य समाजाच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांचा समाजाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना पक्षाचे युवा नेते संदेश पारकर यांनी उपस्थिती दर्शवली होती

पारकर म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यामध्ये वैश्य समाजाची एक विशिष्ट ताकद आहे वैश्य समाजाने आपले जे कर्तुत्व आहे सर्व क्षेत्रांमध्ये उभं केलेलं आहे सामाजिक ,राजकीय, व्यापारी हा वेगळा ठसा वैश्य समाजाने कुमठवलेला आहे खरंतर आपण संघटित होतोय सातत्याने एकत्रित येतोय अशाच पद्धतीने आपल्याला संघटित होण्याची गरज आहे जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत सातत्याने होणारा आपल्यावर अन्याय तो सातत्याने होत राहणार आहे त्या सगळ्या अन्यायाला वाचा फोडायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मजबुतीने राजकीय विचार बाजूला ठेवून वैश्य समाज म्हणून सर्वांनी एकत्र यावे लागेल

याची सुरुवात कुठेतरी चातुर्मास माध्यमातून कणकवलीच्या या जिल्ह्यामधून सुरुवात झाली आणि हजारोच्या संख्येने या जिल्ह्यातला वैश्य समाज एकत्रित झाला गुरूंचे विचार या ठिकाणी स्वीकारले

या नांदगाव मधील वैश्य समाज एकत्र झाला आणि त्यांनी त्या चातुर्मासामध्ये महत्त्वाची भूमिका इथल्या वैश्य समाजाने निभावली एवढेच नाही तर जिल्ह्यामध्ये पदयात्रा झाली पदयात्रेला मोठ्या संख्येने नांदगाव मधील वैश्य समाज एकत्र आलेला होता म्हणून आज ज्या समाजामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे ज्या समाजामध्ये दातृत्व , कर्तुत्व अशा प्रकारचा हा वैश्य समाज आहे म्हणून येणाऱ्या नव्या पिढीला आपण घडवण्याची गरज आहे

जरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैश्य समाज थोड्या प्रमाणात असला तरी लोकांमध्ये मिसळणारा समाज आणि सेवाभावी आहे प्रत्येक बाजारपेठेमध्ये व्यापारी, डॉक्टर ,इंजिनिअर म्हणून बसलेला आहे अनेक क्षेत्रांमध्ये आपलं कर्तुत्व त्याने उभ केलेला आहे यावेळी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी नांदगाव येथील वैश्य समाज स्नेहसंमेलन या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी वैश्य समाजाचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!