*कोकण Express*
*33 वर्ष अहोरात्र प्रामाणिकपणे प्रवाशांची सेवा करून अनिल कांबळी सेवानिवृत्त*
राज्य परिवहन महाराष्ट्र च्या एस टी डेपो कणकवली आगार चे मेकॅनिकल कर्मचारी श्री अनिल हरिश्चंद्र कांबळी हे ३१ डिसेंबर २०२२ रोजी सेवा निवृत्त झाले या निमित्ताने कणकवली आगार येथे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रम चे निवेदन वरीष्ठ लिपिक भाऊ गोसावी व विभागीय कार्यशाळेचे निवृत्त कर्मचारी सिनेअभिनेते अभय खडपकर यांनी केले ,या कार्यक्रम ला डेपो आगार व्यवस्थापक प्रमोद यादव ,सिक्युरिटी ऑफिसर माने सर ,मदने सर ,ये डब्ल्यु येस राठोड , एच बी रावराणे ,नंदू कोरगावकर ,अशोक राणे ,कृष्णा रावराणे ,घन :श्याम राणे ,अनिल लोकरे ,दिनेश गोगटे,गणेश शिरकर, आशिष काणेकर तसेच येस टी डेपो तील सर्व कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते ,२०१३ मध्ये अनिल कांबळी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने त्रस्त होऊन मार्च २०१५ मध्ये पूर्ण बरे होऊन ते आपल्या कामावर रुजू झाले ,कांबळी यांचे आपल्या कामावर व एस टी वर नितांत प्रेम असल्यामुळे व मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे उपस्थित सर्व भावुक झाले तसेच मित्र परिवार व अधिकारी कर्मचारी यांनी आपले मनोगत व्यक्त करत अनिल कांबळी यांना शुभेच्छा दिल्या ,अनिल कांबळी यांच्या पत्नी सौ अक्षता कांबळी ह्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत तर दोन्ही मुलं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत ,या वेळी अक्षता कांबळी यांनी मनोगत व्यक्त करून सेवा निवृत्ती चा संधिच्छा कार्यक्रम आयोजित केल्या बद्धल उपस्थितांचे आभार मानून आयोजकांचे धन्यवाद मानले