*कोकण Express*
*पंढरपूर माघवारी जाण्यासाठी एसटी मध्ये दरवर्षी प्रमाणे 20 जेष्ठ वारकरी यांना आरक्षण द्या*
*विभाग नियंत्रक याच्या कडे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय ची मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो वारकरी एसटी ने पंढरपूर माघ वारीला जातात. जिल्ह्यामध्ये 100 ते 125 एसटी गाड्या ग्रुप बुकिंग होतात. गेल्या काही वर्षांत जेष्ठ वारकरी यांना एका गाडी मध्ये 20 जेष्ठ वारकाऱ्यांसाठी सूट मिळत होती मात्र यावर्षी ही सूट देण्यासाठी काही आगार प्रमुख नकार देत आहेत.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग च्या पदाधिकारी व वारकरी यांनी आज एसटी विभाग नियंत्रक याना आज निवेदन दिले व वारकाऱ्यांना किमान एका गाडी मागे 20 जेष्ठ नागरिक(वारकरी)असे आरक्षण द्यावे ही विनंती करण्यात आली. न दिल्यास वारकाऱ्यांना आंदोलन करावे लागेल हे ही तोंडी सांगण्यात आले.
प्रभारी विभाग नियंत्रक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे आश्वासन दिले
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर,सचिव श्री राजू राणे, संचालक श्री प्रभाकर सावंत,सत्यवान परब, कार्याध्यक्ष ह.भ.प.रामचंद्र कदम,प्रभाकर राणे,गणपत घाडीगांवकर, आबा सावंत, विष्णू धरणे,गजानन राणे व वारकरी उपस्थित होते.