*कोकण Express*
*नांदगाव ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर सर्व सदस्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात*
*उपसरपंच पदी इरफान साटविलकर यांची बिनविरोध निवड*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर तसेच सर्व सदस्य यांनी आज पदभार स्वीकारला असून या नवनिर्वाचित सरपंच तसेच नवनिर्वाचित उपसरपंच व सदस्यांचा स्वागत सोहळा नांदगाव ग्रामपंचायत च्या सभा मंडपामध्ये उत्साहात संपन्न झाला आहे.आज नांदगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदाचे निवडणूक ही पार पडली असून नांदगाव उपसरपंच पदी इरफान साठविलकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे.
यावेळी नांदगाव माजी सरपंच , आफ्रोजा नावलेकर,शशिकांत शेटये , विष्णू गुरव , हर्षदा वाळके, आनंदी बापार्डेकर, बाळकृष्ण बापार्डेकर, ज्येष्ठ नागरिक बाबुराव मेस्त्री ,त्याच प्रमाणे भाजपचे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव , नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये, हनुमंत वाळके, रज्जाक बटवाले, शकील बटवाले,तसेच नवनिर्वाचित सदस्य यामध्ये विठोबा कांदळकर, विनोद मोरये, पुजा सावंत, अक्षता खोत, अनिकेत तांबे, गौरी परब, रमिजान बटवाले, संतोष बिडये नमिता मोरये जैबा नावलेकर आदी आजी माजी सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सत्कार सोहळ्यसखठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले होते.या आजच्या पदग्रहण सोहळा निमित्ताने नांदगाव येथे रक्तदान शिबीर सकाळ च्या सत्रात आयोजित करण्यात आले होते.याला ही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी सर्व नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच तसेच सदस्यांचे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले आहे. तसेच उपस्थित नागरिकांनी ही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.यावेळी सत्कार ला उत्तर देताना नवनिर्वाचित सरपंच रविराज ऊर्फ भाई मोरजकर बोलताना म्हणाले की आपण जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला तडा न लावू देता पाच वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे काम करेन. हे काम करत असताना माझ्या हातातून अथवा माझ्या टीमच्या हातातून काही चुका आपल्याला दिसल्या त्या चुका आम्हाला अवश्य सांगाव्यात असे सांगत सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले आहे.यावेळी नांदगाव माजी सरपंच शशिकांत शेटये, बाळकृष्ण बापार्डेकर, हनुमंत वाळके यांनी ही मनोगत व्यक्त केले आहे.
कार्यक्रम सुत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर,तर आभार माजी सरपंच हर्षदा वाळके यांनी मानले आहे.