देवगड तालुक्यातील मणचे ग्रा.पं.सदस्य मन्सूर सोलकर सेनेत..

देवगड तालुक्यातील मणचे ग्रा.पं.सदस्य मन्सूर सोलकर सेनेत..

*कोकण Express*

*देवगड तालुक्यातील मणचे ग्रा.पं.सदस्य मन्सूर सोलकर सेनेत…!*

*संदेश पारकर व सुशांत नाईक यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत केले स्वागत…!*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड तालुक्यातील मणचे गावचे नवनिर्वाचित अपक्ष ग्रा.पं. सदस्य मन्सूर सोलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना युवा नेते संदेश पारकर व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. कणकवली विजय भवन येथील कार्यालयात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर आणि युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पक्षांमध्ये स्वागत केले आहे.तसेच यावेळी देवगड तालुकाप्रमुख जयेश नर, युवा सेनेचे तालुकाप्रमुख फरित काझी, गुरुनाथ मेस्त्री, दीपक तोरसकर,विष्णू घाडी,सुरेश घाडी, फयाज पावसकर,प्रकाश भेक्रे, संजय गुरव,फकीर मेस्त्री, असलम शिरगावकर, इर्शाद शिरगावकर आदि उपस्थित होते.दरम्यान ग्रा.पं. सदस्य मन्सूर सोलकर यांना श्री.पारकर व नाईक यांनी भगवी शाल घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!