कणकवली नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध

कणकवली नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध

*कोकण Express*

*कणकवली नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध…*

*ॲड. विराज भोसले, संजय कामतेकर, उर्मी जाधव यांना पुन्हा संधी…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नगरपंचायत विषय समिती सभापतींची निवड आज बिनविरोध झाली. अवघ्या तीन महिन्यांवर नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक असल्‍याने पूर्वीच्याच सभापतींना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी ॲड.विराज भोसले, आरोग्‍य सभापतीपदी संजय कामतेकर, महिला व बालकल्‍याण समिती सभापतीपदी उर्मी जाधव आणि पाणी पुरवठा व बाजार समितीच्या सभापतीपदी बंडू हर्णे यांचा समावेश आहे. सभापती निवडीनंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडीसाठी आज नगरपंचायतीची विशेष सभा झाली. यात तिनही सभापतीपदांसाठी एकमेव अर्ज आला होता. दुपारी तीन वाजता या सभापतींची निवड बिनविरोध झाल्‍याचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!