*कोकण Express*
*ओसरगाव मळी सडेवाडीच्या ग्रामस्थांनी गावातील ऊच्च रक्तदाब व मधुमेहा च्या रुग्णांना तपासणीसाठी उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी यंत्र मोफत उपलब्ध करून देऊन समाजपुढे आदर्श ठेवला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील ओसरगाव हे हायवे लगत असले तरी मळी व सडे वाडी हायवे पासून दूर दुर्गम डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे पेशंटना कसाल , कणकवली किंवा ओरस येथे येण्यासाठी साधारण एक तास प्रवास करावा लागतो. त्यामुळे गावातच रुग्णांना आपल्या तब्बेतीचा रिपोर्ट मिळण्यासाठी गावातील तरूणांनी पैसे जमा करून दोन सेट उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी यंत्र घेऊन आपल्या वाडीतच तपासणी उपलब्ध करून दिली. आत्ता रुग्णांना घराजवळच सोय उपलब्ध झाल्या मुळे त्यांना पायपीट करावी लागत नाही. अशा आदर्श उपक्रमामुळे मळी-सडे वाडीतील, ग्रामस्थ प्रविण धुरी, शिवराज देसाई,गणेश कदम,मनोज ( भाई) परब,राजु वरक,सागर कदम, स्वप्निल तळेकर,दिपक धुरी,मनोज कदम,सुशांत कदम,बाळू गवस,निलेश कदम,सौ.प्राजक्ता गणेश कदम,प्रदिप तळेकर,गौरेश कावले,भूषण कदम,समिर कदम,आदित्य देसाई,समिर वामन देसाई उमेश तळेकर,राजा दळवी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच वाडीतील राहिवाशी रागोजी कदम, पांडुरंग शिंदे,रवि कावले, सौ. स्नेहा कावले, मधु कावले यांनी घरोघरी जाऊन लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे ठरवले आहे.