*कोकण Express*
*फोंडाघाट ज्युनिअर कॉलेजचे भूगोल विषयाचे प्राध्यापक ज्ञानोबा बाबुराव फड यांना कोकण रत्न पुरस्कार प्राप्त*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
आज दिनांक 25 डिसेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे भूगोल विषयाचे अध्यापन करणारे ज्ञानोबा बाबुराव फड यांना कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय श्री बाळाराम पाटील यांच्या हस्ते’ कोकण रत्न’ पुरस्कार देऊन सिंधुदुर्ग कृषी भवन येथे गौरविण्यात आले. मा.श्री फड सर हे गेली अनेक वर्ष शैक्षणिक ,सामाजिक व धार्मिक क्षेत्रात काम करीत असून यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार जिल्हा स्तरावर प्राप्त झाले आहेत त्यांनी कॉलेजमध्ये अध्ययन अध्यापनाचे काम करत असताना अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या खाजगी संस्थेच्या योजना राबविल्या असून त्यांचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला आहे ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून कॉलेजमध्ये ओळखले जातात अध्यापनाबरोबरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वक्तृत्व स्पर्धा विविध दिन साजरे करण्यामध्ये ते सहभागी असतात त्यांच्या या यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. सुभाष सावंत सेक्रेटरी मा. श्री. चंद्रशेखर लिंग्रस खजिनदार मा.श्री. आनंद मर्ये स्कूल कमिटी चेअरमन मा. श्री बबन पवार सर्व संचालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री एस. ए.सावंत सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि फोंडाघाट ग्रामस्थ यांच्याकडून फड सर यांचे अभिनंदन आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.