कणकवलीत शहरात दोन बंगले आणि दोन कौलारी घर फोडत चोरट्यांचा धाडसी चोरीचा केला प्रयत्न

कणकवलीत शहरात दोन बंगले आणि दोन कौलारी घर फोडत चोरट्यांचा धाडसी चोरीचा केला प्रयत्न

*कोकण Express*

*कणकवलीत शहरात दोन बंगले आणि दोन कौलारी घर फोडत चोरट्यांचा धाडसी चोरीचा केला प्रयत्न*

*कणकवली शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहरात सातत्याने अज्ञात चोरट्यांकडून चोरीचे प्रयत्न सुरु आहेत. चोरट्यांनी पुन्हा मंगळवारी मध्यरात्री कणकवली शहरातील कनकनगर भागातील अंकुश सावंत, सुरभाजी राणे यांच्यासह अन्य दोघांची घरे फोडत ४ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. यापैकी एका बंगल्यामध्ये सोने व रोख रक्कम होती,मात्र,ती चोरट्यांच्या हाती लागली नाही. मात्र,सातत्याने होत असलेल्या कणकवली शहरातील चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कणकवली शहरासह तालुक्यात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र अद्यापही चोरटे पोलिसांना सापडलेले नाहीत. कणकवली कनकनगर येथे चोरी झाल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ,पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र नानचे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत संबंधित घरमालकांची संपर्क साधला.त्या घरमालकांनी आपल्या घरातून कोणताही ऐवज लंपास झाला नसल्याचे प्रथमदर्शनी सांगितले आहे,त्यानंतर शॉन पथकाला प्राचारण करण्यात आले. मात्र, कनकनगर काही भागात श्वान जाऊन घुटमळला. त्यामुळे कणकवली पोलिसांनी याबाबत कोणतीही पोलीस ठाण्यात तक्रार मिळाल्याने या चोरीची नोंद केलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत झालेल्या चोरीबाबत माहिती पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान एका घरातून तीन तोळ्याचे मंगळसूत्र, काही रोख रक्कम कपाटात न ठेवता दुसऱ्याच एका जागेवर ठेवल्यामुळे हा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला नाही. सुमारे तीन ते चार लाखाचा ऐवज असल्याचे समजते. चोरी झालेल्या घरातील त्या कुटुंबीयांनी आपला ऐवज व रोख रक्कम आढळल्याने सुटकेचा निःश्वास टाकला आहे .या घरांमध्ये चोरट्याने घुसताना कडीकोयंडे तोडत प्रवेश केला.त्यानंतर असलेली लोखंडी कपाटे तोडून सामानाची विस्काविस्क करत कपडे विस्कटून चोरीला काय साहित्य मिळते का? याचा प्रयत्न चोरट्याने केल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!