*कोकण Express*
*दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त बांदा भाजपतर्फे त्यांना आदरांजली*
*बांदा ः प्रतिनिधी*
दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त बांदा भाजपतर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. वाजपेयी हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. देशाच्या विकासात्मक दृष्टीने त्यांनी दूरदृष्टी ठेऊन महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी यावेळी सांगितले. माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदा भाजपतर्फे अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, सरपंच अक्रम खान, माजी जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, नवनिर्वाचित सरपंच प्रियांका नाईक, ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब, बाळू सावंत, रुपाली शिरसाट, रत्नाकर आगलावे, माजी सरपंच मंदार कल्याणकर, मकरंद तोरसकर, सिद्धेश महाजन, सुधीर शिरसाट, प्रदिप सावंत, केदार कणबर्गी, तालुका सचिव दादू कविटकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, उमांगी मयेकर, शैलेश केसरकर, सुनील धामापूरकर, अवंती पंडीत, राजा सावंत आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.