*कोकण Express*
*कलमठ सरपंच संदीप मेस्त्री व ग्रा.पं.सदस्यांनीं केंद्रीय मंत्री नाम. नारायण राणे यांची घेतली भेट*
*केंद्रीय मंत्री ना.राणे यांनी दिल्या शुभेच्छा*
कलमठ ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करत मोठ्या मताधिक्याने विजय संपादन करणाऱ्या संदीप मेस्त्री आणि कलमठ ग्रामपंचायत सदस्यांना केंद्रीय मंत्री नाम. नारायण राणे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नाम. नारायण राणे यांनी कलमठचे नूतन सरपंच संदीप मेस्त्री यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देताना भविष्यातही चांगल्या प्रकारचे काम करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी कलमठ सरपंच
संदिप मेस्त्री यांच्यासमवेत भाजप कणकवली तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, विजय चिंदरकर, राजू परूळेकर, स्वप्निल चिंदरकर, बाबू नारकर, नितिन पवार,दिनेश गोठनकर, जीतू कांबळे,अमजद शेख, स्वाती नारकर,पपु यादव,श्रेयस चिंदरकर,अमोल चिंदरकर व अन्य उपस्थित होते.