*कोकण Express*
*मातृ हृदयाचे संवेदनशील समाज सुधारक म्हणजे साने गुरुजी: प्रा.परेश धावडे*
” मातृदयाचे संवेदनशील मन असणारे समाज सुधारक म्हणजे साने गुरुजी होय. तरल संवेदनशीलतेने देश सुसंस्कृत पणे घडविता येतो.खरा धर्म कोणता आणि बलशाली भारत होण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे. हे सांगताना ज्यांच्या डोक्यावरचे आभाळ हरवलेला आहे आणि ज्यांना काय करायचं आहे हे माहित नसलेल्यांना दिशादर्शक मार्गदर्शन व्हा.असे सांगत. माणुसकीचा संदेश देणारे मातृहृदयाचे संवेदनशील साहित्यिक आणि समाज सुधारक म्हणून त्यांचं कार्य अद्वितीय आहे .प्रेमाने जग जिंकता येतं यावर प्रगाड श्रद्धा असलेले साने गुरुजी आयुष्यभर समाज हितैशी विचाराने झपाटलेले होते. त्यांचे हे गुण आपण आत्मसात करूया; जेणेकरून आपल्या पद्धतीने आपण फुल ना फुलाची पाकळी समाजासाठी काहीतरी करण्याचं व्रत अंगीकारता येईल”. असे उद्गार बॅ. नाथ पै बी .एड. महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे यांनी काढले व त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, प्रा वैशाली ओटवणेकर, बी.एड महाविद्यालयाचे प्रा नितीन बांबर्डेकर, महिला महाविद्यालय आणि रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, प्रसाद कानडे, पांडुरंग पाटकर, किरण करंदीकर व बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमाची प्राचार्य, प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित त्यांच्या तर्फे पुष्प व पुष्पहार अर्पण करून साने गुरुजींना आदरांजली अर्पण करण्यात आली