*कोकण Express*
*कोरोना वाढला,लोकसभा-राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब*
*आठवडाभर आधीच संसदेचं अधिवेशन गुंडाळले*
*हिवाळी अधिवेशनात लोकसभेत 68 तास 42 मिनिटे तर राज्यसभेत 64 तास 50 मिनिटे कामकाज*
चीनमध्ये कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. देशात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने पंतप्रधान मोदींपासून, आरोग्य मंत्री, निती आयोग, आरोग्य सचिव आदींनी कोरोनाचे नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे.असे असताना आज अचानक लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चीनच्या घुसखोरीचा मुद्दा जोरदार गाजला आहे.विरोधकांनी संसदेत यावर जोरदार आक्षेप घेत चीनच्या घुसखोरीवर चर्चा करण्याची मागणी केली.तसेच कोरोना रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार अलर्टवर आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजच अधिवेशन संपविले.त्यामुळे सहा दिवस आधीच संसदेचं अधिवेशन गुंडाळले असल्याची चर्चा सुरु आहे.*
संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहेत. निश्चित कालावधीपेक्षा सहा दिवस आधीच अधिवेशन गुंडाळण्यात आल्याची यामुळं चर्चा होत आहे.७ डिसेंबर ते २९ डिसेंबर या १७ कामकाजांच्या दिवसांत यंदा अधिवेशन पार पडणार होतं.मुदतीआधीच ६ दिवस गुंडाळलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत 68 तास 42 मिनिटे तर राज्यसभेच्या २५८ व्या अधिवेशनात 64 तास 50 मिनिटे कामकाज झाले, असे सरकारच्या वतीने आज सांगण्यात आले.*मुळातच गुजरात-हिमाचल प्रदेश व दिल्ली मनपाच्या निवडणुकांमुळे उशीरा सुरू झालेले यंदाचे हिवाळी संसद अधिवेशन जेमतेम १७ दिवसांचे होते. ते २९ डिसेंबरपर्यंत म्हणजे १७ बैठका इतके चालविण्याचा सरकारचा मानस होता. मात्र अधिवेशन मध्यावर येता येता अनेक खासदारांकडून नाताळ व नववर्षानिमित्त मुदतीआधीच म्हमजे २५ डिसेंबरपूर्वीच अधिवेशन संपवावे अशी जोरदार मागणी आली. दोन तीन विधेयके व अर्थसंकल्पीय पुवठ्या मागण्यांना मंजुरी या व्यतिरिक्त सरकारनेही अन्य महत्वाचे कामकाज प्रस्तावित केले नव्हते. परिणामी अधिवेशन आज गुंडालणार अशी चर्चा मागच्याच आठवड्यात सुरू झाली होती.
लोकसभा आणि राज्यसभेच्या बिझनेस अॅडव्हाझरी काऊन्सिल कामकाज सल्लागार परिषदेच्या बैठकीत अचानकपणे हिवाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.अरुणाचलप्रदेशात भारत-चीन सीमेवर अर्थात एलएसीवर दोन्हीकडील सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून चर्चेसाठी विरोधीपक्षांकडून वारंवार सभागृहात गोंधळ घालण्यात येत आहे. त्यामुळं गुरुवारी लोकसभेच कामकाज पाच वेळा स्थगित करावं लागलं होतं. यापार्श्वभूमीवर कामकाजात वारंवार व्यत्यय येत असल्यानं अनिश्चित काळासाठी ते थांबवण्यात आलं आहे.तर दुसरीकडं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासाठी राज्यसभेचं हे पहिलचं पूर्णवेळाचं अधिवेशन ठरलं. सभागृहाचं कामकाज थांबवताना त्यांनी आगामी ख्रिसमस, पोंगल, लोहरी आणि इतर सणांच्या सदस्यांना सदिच्छा दिल्या. तसेच वाढत्या कोरोनाच्या प्रकरणांबद्दल सतर्क राहण्याचं आवाहनही केलं.
*कोरोनावर पंतप्रधान म्हणाले…*
*कमजोर आणि वृद्धांसाठी बूस्टर डोसला प्रोत्साहन द्यावे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा. सणासुदीच्या काळात गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी मास्क घाला. राज्यांनी रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांशी संबंधित सुविधा द्याव्या. कोरोना महामारी अजून संपलेली नाही. विमानतळांवर देखरेख ठेवण्याच्या उपाययोजना मजबूत करा. राज्यांनीही ऑक्सिजन पुरवठा व इतर बाबतीत सज्ज राहावे, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.*
७ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अधिवेशनाच्या तिसऱया कामकाजी दिवशीच अरुणाचल प्रदेशातील तवांग येथील यांगत्से येथे चिनी लष्करासोबत झालेल्या संघर्षाची बातमी `फुटली` आणि धिवेशनाचा शांत नूर पालटला. चीनच्या कुरापतीवरील चर्चेच्या मागणीवर विरोधक व चर्चा होऊ देणारच नाही यावर सरकार हे दोघेही ठाम राहिले. राज्यसभेत सरकारला अजूनही बहुमत नसल्याने येथे विरोधकांचा आवाज बुलंद असतो. परिणामी वरिष्ठ सभागृहातील वातावरणाचे तापमान जास्त राहिले. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचे हे पहिलेचअधिवेशन होते. त्यामुळे कामकाज चालविण्याबाबत विरोधक व काँग्रेसमध्येही सुरवातीला अनुकूल वातावरण होते. मात्र चर्चा करणार नाही हा सरकारचा पवित्रा व खुदद पीटासीन अधिकाऱयांकडूनच वेळोवेळी करण्यात आलेली टिप्पणी यामुळे अधिवेशनाचा रंग पालटला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी धनखड यांच्यावरूनच अखेरचे दोन दिवस उग्र रूप धारण केले.
धनखड यांनी समारोपाच्या भाषणात सभागृहातील गदारोळाबाबत पुन्हा खंत व्यक्त करताना देसासमोर अनुकरणीय मानदंड स्थापित करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत धनखड यांनी हेही नमूद केले की आमच्या (संसद सदस्य म्हणून) जबाबदाऱया आम्ही ओळखत नाही व त्यानुसार संसदेत आचरण करत नही तोवर देशातील जनता संसदेकडे वेगळ्या नजरेने पाहील. कोवीड महामारीने पुन्हा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमीवर धनखड यांनी खासदारांना, कोवीड आरोग्य दिशानिर्देशांचे काटेकोर पालन करण्याचेही आग्रही आवाहन अखेरीस केले.
*लोकसभा*
लोकसभेच 13 बैठकांमध्ये सुमारे 97 टक्के कामाची उत्पादकता आणि 68 तास 42 मिनिटे काम झाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, 7 डिसेंबरपासून सुरू झालेल्या 17 व्या लोकसभेच्या या 10 व्या अधिवेशनात 13 बैठका झाल्या, ज्यामध्ये 68 तास 42 मिनिटे काम झाले. या सत्रातील कार्य उत्पादकता सुमारे 97 टक्के होती. सभागृहाचे 102 टक्के कामकाज झाले.*
*राज्यसभेतील कामकाज*
वरिष्ठ सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यापूर्वी सभापती जगदीप धनखर यांनी सांगितले की, या १३ दिवसांत राज्यसभेत कामकाज 64 तास 50 मिनिटांच्या प्रस्तावित कामकाजापैकी ६३ तास २० मिनीटे प्रत्यक्ष कामकाज झाले. १२० टक्के उत्पादकता राहिली. गोंधळामुळे पावणेदोन तास वाया गेले. महत्त्वाच्या ९ विधेयकांवर सभागृहात चर्चा होऊन ती मंजूर करण्यात आले. २० महत्त्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा झाली त्यात १२० सदस्यांनी विचार मांडल्याचे त्यांनी सांगितले. ८२ तारांकित व १२० अतारांकित प्रश्नांना सरकारच्या वतीने उत्तरे देण्यात आली. शून्य प्रहरात जनहिताच्या वेगवेगळ्या १०६ मुद्यांवर तर विशेषोल्लेखाचे २०५ मुद्दे मांडण्यात आले. ३६ संसदीय समित्यांचे (राज्यसभा) अहवाल सदनाच्या पटलावर मांडण्यात आले.