महापुरुषांच्या अवमान प्रकरणी नागपूर येथे महाविकास आघाडीच्या आमदारांचे तीव्र आंदोलन

महापुरुषांच्या अवमान प्रकरणी नागपूर येथे महाविकास आघाडीच्या आमदारांचे तीव्र आंदोलन

*कोकण Express*

*महापुरुषांच्या अवमान प्रकरणी नागपूर येथे महाविकास आघाडीच्या आमदारांचे तीव्र आंदोलन*

*महापुरुषांचा अवमान करणाऱ्या सरकारचा केला निषेध*

*आ. वैभव नाईक व महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी*

भाजप नेत्यांनी व राज्यपालांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते व आमदार आक्रमक झाले असून गुरुवारी त्यांनी नागपूर येथे विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन छेडले. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आंदोलनात सहभागी होत घोषणाबाजी केली.

याप्रसंगी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमान करणाऱ्या सरकारचा निषेध असो, न्यायालयाचा अवमान करणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो, राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवा अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला.यावेळी शिवसेना, कॉंग्रेस, आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार आंदोलनात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!