*कोकण Express*
*सावंतवाडीतील सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिरचा उद्या वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील सुधाताई वामनराव कामत विद्या मंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. २ चा वार्षिक स्नेहसंमेलन मेळावा उद्या २४ डिसेंबरला सायं. ५:०० वा. आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शाळा सांस्कृतिक व व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघ कार्याध्यक्ष भरत गावडे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व योगा शिक्षक विकास गोवेकर, नाट्यदिग्दर्शक व प्रशिक्षक सचिन धोपेश्वरकर, पत्रकार तथा ओंकार कला मंचचे संस्थापक अमोल टेंबकर, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सावंतवाडी केंद्रप्रमुख स्नेहा लंगवे आदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी ठीक पाच वाजता सुरू होणार असून सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशालेच्या वतीने करण्यात आले आहे.