*कोकण Express*
*नांदगाव चा दहीकाला उद्या शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर रोजी*
*विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*
*नांदगाव : प्रतिनिधी*
सालाबाद प्रमाणे कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील नांदगाव चा दही कला उद्या शुक्रवार दिनांक 23 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे यानिमित्त श्री देव रामेश्वर ट्रस्ट नांदगाव गोसावी वाडी कुंभारवाडी यांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये सकाळी 10 वा.पूजा विधी , रात्री 8 ते 10 स्थानिक भजने,10 ते 12 श्री राम पालखी सोहळा , रात्री 12 वा.श्री बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे.तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.