*कोकण Express*
*प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि पालकमंत्री चव्हाण यांनी आमदार नितेश राणे यांचे केले अभिनंदन…!*
*सिंधुदुर्गात सर्वाधिक भाजपचे सरपंच आणि ग्रामपंचायत*
*कणकवली-देवगड- वैभववाडी मतदारसंघात तब्बल ८३ सरपंच भाजपचे विजयी,
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक सरपंच निवडून आणले. या यशात कणकवली मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आमदार नितेश राणे यांचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नितेश आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन केले आहे.
हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून या अधिवेशनात ला आमदार नितेश राणे हे ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि सर्वाधिक ग्रामपंचायत वर विजय मिळवल्यानंतर विधानसभेत पोचले यावेळी आमदार नितेश राणे यांना पालकमंत्री चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.