*कोकण Express*
*मतमोजणीच्या ६ फेऱ्यात लागणार रत्नागिरी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींचा फैसला*
*रत्नागिरी । प्रतिनिधी*
रविवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मतदानानंतर आता प्रशासन मतमोजणीला सज्ज झाले असून रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवणुकीची मतमोजणी सामाजिक न्याय भवन येथे मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होणार आहे.
रविवारी रत्नागिरी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या ७५ प्रभागांसाठी मतदान झाले. निवडणूक असलेल्या २५ ग्रामपंचायतींमध्ये कासारवेली, केळये, गणेशगुळे, गावडे आंबेरे, चांदोर, चाफेरी, जांभारी, टिके, टेंभ्ये, तरवळ, तोणदे, धामणसे, निवळी, निवेंडी, पिरंदवणे, पूर्णगड, फणसवळे, भगवतीनगर, मालगुंड, मावळंगे, वळके, विलये, वेतोशी, सतकोंडी, साठरे या ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांचा फैसला होणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी शहरानजीक असलेल्या सामाजिक न्याय भवन येथे सकाळी १० वाजल्यापासून होणार असून २५ ग्रामपंचायतींचा फैसला सहा फेऱ्यांमध्ये होणार आहे. रत्नागिरी हा पालकमंत्री उदय सामंत संघ असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मतमोजणीचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.
फेरी क्रमांक 1
कासारवेली :- प्रभाग 1 ते 4
केळे :- प्रभाग 1 ते 3
गणेशगुळे :- :- प्रभाग 1 ते 3
गावडे आंबेरे :- :- प्रभाग 1
फेरी क्रमांक :- 2
गावडे आंबेरे :- :- प्रभाग 2, 3
चांदोर :- प्रभाग 1 ते 3
चाफेरी :- प्रभाग 1 ते 3
जांभारी :- प्रभाग 1 ते 3
टिके :- प्रभाग 1 , 2
फेरी क्रमांक 3
टिके :- प्रभाग 3
टेंब्ये :- प्रभाग 1 ते 3
तरवळ :- प्रभाग 1 ते 4
तोनदे :- प्रभाग 1 ते 3
धामनसे :- प्रभाग 1, 2
फेरी क्रमांक :- 4
धामनसे :- प्रभाग 3
निवळी :- प्रभाग 4
निवेंडी :- प्रभाग 1 ते 3
पिरनदवणे :- प्रभाग 1 ते 3
पूर्णगड :- प्रभाग 1 ते 3
फनसवळे :- प्रभाग 1, 2
फेरी क्रमांक – 5
फणसवळे :- प्रभाग 3
भगवतीनगर :- प्रभाग 1 ते 3
मालगुंड :- प्रभाग 1 ते 4
मावळांगे :- प्रभाग 1 ते 3
वळके :- प्रभाग 1
फेरी क्रमांक 6
वळके :- प्रभाग 2, 3
विल्ये :- प्रभाग 1 ते 3
वेतोशी :- प्रभाग 1 ते 3
सत्कोंडी :- प्रभाग 1, 2
साठरे :- प्रभाग 1 ते 3