*कोकण Express*
*शालेय जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेत कासार्डे विद्यालयाचे घवघवीत यश*
*:६ खेळाडुंची विभागीय स्पर्धेसाठी निवड*
*कासार्डे:- संजय भोसले*
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धा क्रीडा संकुल ओरोस येथे ७ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली.यामध्ये कणकवली तालुक्यातील कासार्डे विद्यालयाच्या ६ खेळाडूंनी अभिनंदनीय यश संपादन केले आहे.या स्पर्धेतील गटनिहाय यशस्वी झालेले खेळाडू खालील प्रमाणे
*१७ वर्षाखालील मुलींच्या गटात-*
श्रद्धा संतोष तेली-प्रथम ,
अनुष्का विनायक चव्हाण-
तृतीय
*१७ वर्षाखालील मुलांच्या गटात-*
अथर्व सुनील भोगटे-तृतीय क्रमांक
*१९ वर्षाखालील मुलींच्या गटात-*
वैष्णवी दीपक गायकवाड-
द्वितीय क्रमांक,कोमल शिवराम पाताडे,तृतीय क्रमांक
*१९ वर्षाखालील मुलांच्या गटात-*
वेदांत विठोजी राणे-तृतीय क्रमांक आला आहे.
हे सर्व खेळाडू सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
या यशस्वी खेळाडूंना विद्यालयाच्या शिक्षिका सौ. एम.ए.कुडतरकर, विनायक पाताडे तसेच क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,दिवाकर पवार,ऋषिकेश खटावकर, नवनाथ कानकेकर, रामचंद्र राऊळ व स्क्वॅशचा सिनियर खेळाडू सोनु जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी खेळाडूंचे कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर व सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर व सर्व पदाधिकारी, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर व सर्व पदाधिकारी, प्राचार्य एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन कोल्हापूर विभागीय स्क्वॅश स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.