*कोकण Express*
*तळेरे विद्यालयाला विजय घरत यांच्याकडून संगणक प्रदान*
*कासार्डे ; संजय भोसले*
मुंबईतील समाजसेवक विजय घरत यांच्याकडून तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाला एक संगणक प्रदान करण्यात आला. हा संगणक संच शाळा समिती सदस्य व माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते देण्यात आला. या मदतीबद्दल आभार व्यक्त केले जात आहेत.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, शाळा समिती सदस्य निलेश सोरप, उमेश कदम, तळेरे उपसरपंच दिनेश मुद्रस, कासाडेॅ केंद्रप्रमुख संजय पवार, वारगावचे पदवीधर शिक्षक सत्यवान केसरकर, खारेपाटण केंद्र केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल, तळेरे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्रीराम विभूते, अनिल मेस्त्री, चंद्रकांत तळेकर, उदय तळेकर, दीपक नांदस्कर आदी उपस्थित होते.
विजय घरत हे कोकणातील विविध शाळांना नेहमीच मदत करतात. ग्रामीण भागातील मुले कोणत्याही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहू नये आणि मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी घरत नेहमीच प्रयत्नशील असतात. तळेरे विद्यालयाला दिलेल्या या मदतीबद्दल दिलीप तळेकर यांनी अभिनंदनाचा ठराव घेतला.