*कोकण Express*
*आमदार नितेश राणे १९ डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टीचे कणकवली देवगड वैभववाडी चे आमदार नितेश राणे सोमवार१९ डिसेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान ग्रामस्थ,शेतकरी,मच्छीमार,कार्यकर्ते, पदाधिकारी, यांच्या गाठीभेटी आमदार नितेश राणे घेणार आहे. यावेळी विकास कामांवर आणि जनतेच्या मागण्यांवर चर्चा, संघटनात्मक बैठका घेणार आहेत. मतदार संघात गाठीभेटी देणार आहेत. तर ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत विजयी सरपंच ,सदस्यांचे अभिनंदन करण्यासाठीही ते उपस्थित राहणार आहेत.