*कोकण Express*
*कणकवली महापुरुष मित्रमंडळाच्या वतीने अनिकेत उचले यांचा सत्कार*
*पालकमंत्री ना.उदय सामंत यांनीही केले अभिनंदन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा पत्रकारक्षेत्रातील उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार दै.पुढारीचे कणकवलीतील छायाचित्रकार तथा पत्रकार अनिकेत उचले यांना देण्यात आला.याबद्दल कणकवली महापुरुष मित्रमंडळ, बाजारपेठच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.जेष्ठ नागरिक अनिल मुंज व व्यापारी विजय पारकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन अनिकेत उचले यांना सन्मानित करण्यात आले.
बाजारपेठ महापुरुष मंदिर येथे झालेल्या या सत्कारपर कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी,उपाध्यक्ष राजन पारकर,खजिनदार मंदार सापळे सदस्य चेतन अंधारी,राजेश मानकर,महेश देसाई,सुशील पारकर,निखिल घेवारी,भाई भोगटे,दत्ता तोरस्कर,महेश मुंज,प्रज्वल वर्दम,प्रद्युम मुंज,शैलेश डीचोलकर,बंडू राणे,श्री.काटे,अक्षय डीचोलकर,संदीप अंधारी,अनिल चौधरी आदीसह मंडळाचे पदाधिकारी,व्यापारी,नागरिक उपस्थित होते.
सत्कारपर कार्यक्रमावेळी बोलताना अनिकेत उचले म्हणाले,माझ्या पुरस्काराचा गौरव हा आपल्या मंडळाचा,बाजारपेठेचा गौरव आहे.आपल्या जन्मभूमितील हा पहिला गौरव असून आपणा सर्वांच्या आशीर्वादामुळे हे यश मिळाल्याचे सांगत त्यांनी आभार व्यक्त केले.
अनिकेत उचले हे पत्रकारितेसोबतच मंडळातील व शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात नेहमी अग्रेसर राहणारे असे व्यक्तिमत्व आहे.या पुरस्कारामूळे आपल्या शहराबरोबरच तालुक्याचे नाव पुढे नेत असल्याचा अभिमान असल्याचे गौरउद्गार मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अंधारी यांनी व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.