*कोकण Express*
*पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याचा निषेध – प्रमोद जठार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अमेरिकेत संयुक्त राष्ट्र परिषेदेत देशातून भाषण करताना आमचे परराष्ट्रमंत्री जय शंकर यांनी पाकिस्तान कुरघोडी किती आहेत? त्यांची भूमिका मांडली.त्यानंतर न्यूयॉर्क मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल मुक्ताफळे उधळली.अमेरिकेने लादेनचा खात्मा केला, मात्र मोदींचा खात्मा केला नाही.त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,हिंदुस्तान मध्ये
हा निषेध नागरिक करत आहेत. पाकिस्तान नेहमीच गरळ ओकण्याचे काम करत आहे. हिंदुस्तान मध्ये बॉम्बस्फोट मालिका सुरु होती.मात्र २०१४ सालानंतर ही मालिका थाबंली. मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केलं आणि दाखवून दिले .पाकिस्तान कुरघोडी करू शकत नाही.केली तर आम्ही घुसून मारु हे दाखवलं.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला.त्यावेळी देशाची फाळणी धर्माच्या आधारावर केली होती.त्याला महात्मा गांधी व महापुरुषांना विरोध केला.हिंदू आणि मुस्लिम या फाळणी विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.तरीसुद्धा पाहिले पंतप्रधान होण्याची घाई काहींना होती.फाळणी झाली त्यात हजारो मारले गेले.आता सीमा रेषेवर बजेटपैकी ३० टक्के रक्कम खर्च दोन्ही देशांचा होत आहे.हे दोन्ही देशाला नुकसानीचे आहे.पाकिस्तानला दिवाळखोरीत आहे सकाळ- संध्याकाळ हिंदुस्थानला शिव्या घालण्याचे काम केलं जातं आहे.हिंदुस्तानातील मुस्लिम फार सुखी आणि समाधानी आहेत.पाकिस्तान देश दिवाळखोरीत आहे.आमच्या विरोधात बोलत राहिल्यावर त्यांचे सरकार निवडून येत यासाठी टीका केली जात आहे.त्यानेनिषेध आम्ही कणकवलीत केला.भविष्यात समान नागरी कायदा केला जाणार आहे,असेही प्रमोद जठार यांनी सांगितले.