पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अंतर्गत ‘सागर मित्र’ नियुक्तीस शासनाचा हिरवा कंदील

पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अंतर्गत ‘सागर मित्र’ नियुक्तीस शासनाचा हिरवा कंदील

*कोकण Express*

*पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अंतर्गत ‘सागर मित्र’ नियुक्तीस शासनाचा हिरवा कंदील*

*मा.अतुलजी काळसेकर यांच्या पाठपुराव्यास यश*

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना देशातील जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार व लाभार्थी यामधील दुवा म्हणून सागर मित्र या पदाची निर्मिती करण्यात आली. सागर मित्र या पदावर स्थानिक बेरोजगार ,परंतु मत्स्य व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक आर्हता असणाऱ्या युवक युवतींची कंत्राटी पद्धतीने २०२१-२०२२या कालावधी साठी भरती करण्यात आली होती.परंतु सन २०२२- २३ या कालावधीत सागर मित्र या पदासाठी नियुक्ती झालेली नव्हती.त्यामुळे मत्स्य व्यवसायात इच्छुक असलेल्या व्यक्तींना योजनेची माहीत व लाभ मिळविण्यात अडचणी येत होत्या.
सदर नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी श्री.अतुल काळसेकर , उपाध्यक्ष,जिल्हा बँक सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून मा. मत्स्योद्योग मंत्री श्री.सुधीर मुगंटीवार तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा चालू होता. त्या पाठपुराव्यास यश आले असून महाराष्ट्र शासनाने दी.०९ डिसेंबर २०२२ रोजी परिपत्रक काढून ‘सागर मित्र’ नियुक्तीस शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. सदर अध्यादेश द्वारे पूर्वी काम केलेल्या सागर मित्रांना नियुक्त्या देणे चालू झाले आहे. सध्या सदर सागर मित्रांना चार महिन्या साठी नियुक्त केले जाणार असून भविष्यात त्यांचा कालावधी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.तरी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने चा लाभ घेऊ इच्छिनाऱ्यांनी सागरमित्र यांच्याशी संपर्क साधावा. तसेच पूर्वी काम करत असलेल्या सागरमित्र यांनी अथवा नवीन इच्छुकांनी संबधित जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय कार्यालय येथे संपर्क साधावा. असे आवाहन या प्रसिध्दी पत्रकाद्वारे करीत आहोत.धन्यवाद

*रविकिरण चिंतामणी तोरसकर*
कोकण संयोजक,
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
भारतीय जनता पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!