कासार्डे विद्यालयाच्या वेदांत वायंगणकरची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

कासार्डे विद्यालयाच्या वेदांत वायंगणकरची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

*कोकण Express*

*कासार्डे विद्यालयाच्या वेदांत वायंगणकरची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड*

*कासार्डे:- संजय भोसले*

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा श्री वा. स. विद्यालय माणगाव ता.कुडाळ येथे ८ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली.यामध्ये कासार्डे विद्यालयाच्या कु.वेदांत विनायक वायंगणकर याने अभिनंदनीय यश संपादन केले आहे.त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कु.वेदांत वायंगणकर याने १७ वर्षाखालील मुलांच्या गटात खेळताना जिल्ह्यात
चतुर्थ क्रमांक पटकाविला आहे.
या यशस्वी खेळाडूला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, विनायक पाताडे,नवनाथ कानकेकर व त्याच्या पालकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
हा खेळाडू रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
या यशस्वी खेळाडूंचे कासार्डे विकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर व सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर व सर्व पदाधिकारी, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर व सर्व पदाधिकारी, प्राचार्य एम.डी.खाड्ये,पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!