*कोकण Express*
*साळीस्ते येथे रविंद्र मुसळे यांना जेष्ठ नागरीकांतर्फे श्रद्धांजली वाहीली*
*कासार्डे : संजय भोसले*
ज्येष्ठ नागरिक संघासह अनेक संस्थांना आज मुसळे सरांच्या नेतृत्वाची गरज होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या किर्तीला उजाळा मिळण्यासाठी, त्यांचे कायमस्वरुपी स्मरण राहिल यासाठी नियोजन केले जावे, असे मत निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सुर्यकांत तळेकर यांनी व्यक्त केले. साळिस्ते येथील ज्येष्ठ नागरिकांनी रवींद्र मुसळे यांना आयोजित केलेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी राधाबाई गुरव, बी. पी. साळिस्तेकर, रवींद्र पाताडे, प्रभाकर भिडे, जिल्हा उपाध्यक्ष वामन ताम्हणकर, तळेरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटणकर, सचिव दिलीप पाटिल आदी उपस्थित होते. यावेळी रवींद्र मुसळे यांच्याविषयीचे विविध अनुभव, आठवणी अनेकांनी व्यक्त केले. यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून मुसळे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
तसेच, सेवा निवृत्ती नंतरही त्यांची काम करण्याची तळमळ आणि तळेरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघासाठी वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन या सर्वाला आम्ही मुकलो आहोत. अनेक अर्थाने ते मार्गदर्शक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी प्रभाकर भिडे, दिलीप पाटिल, रवींद्र पाताडे, बी. पी. साळिस्तेकर, प्रभाकर ताम्हणकर, वामन ताम्हणकर, निकेत पावसकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक कोकाटे, चंद्रकांत हरयाण यांच्यासह साळिस्ते, कासार्डे, वारगाव येथील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी सुरेश पाटणकर यांनी प्रास्ताविक केले.