*कोकण Express*
*ठाकरे सेनेला देवगड येथील नारिंगे भूतवाडीतील कार्यकर्त्यांचा मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजपमध्ये प्रवेश*
*आमदार नितेश राणे यांनी नारिंगे गावामध्ये जाऊन केले स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
देवगड नारिंगे येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे अंकुश नामदेव पाटील, रवींद्र सहदेव जोईल यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला कालपासून जेवढ्या जोरात टीका सुरू आहे त्या पेक्षा जास्तपटीने भाजपामध्ये इनकमिंग देखील सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला एक सारखे धक्के मिळत आहेत. आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे स्वागत केले व विकास कामांच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील प्रवेश कर्त्यांना दिली.
यावेळी आम. नितेश राणे, सावी लोके, सुनील पारकर प्रमिला मुळये, डॉ. स्वाती बापट, अरविंद राणे, महेश राणे सरपंच व भाजप कार्यकर्ते उपस्थितीत होते.