हळवलचे माजी उपसरपंच अरुण राणे यांचे निधन

हळवलचे माजी उपसरपंच अरुण राणे यांचे निधन

*कोकण Express*

*हळवलचे माजी उपसरपंच अरुण राणे यांचे निधन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख व हळवल गावचे माजी उपसरपंच अरुण घनश्याम राणे ( 47) रा. हळवल नारळीची वाडी यांचे गोवा बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात शुक्रवारी रात्री हळवल मुख्य स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिवसेनेचे कळसुली विभागाचे माजी विभागप्रमुख व हळवळ गावचे उपसरपंच या पदांवर काम करताना त्यांनी हळवल गावातील विविध प्रश्न सोडविले होते.हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. हळवल येथे 12 डिसेंबरला त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला होता. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते .मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्यांचे निधन झाले .त्यांच्या पश्चात आई, वडील,पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!