ठाकरे शिवसेनेचे माजी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रज्जाक बटवाले यांचा मुस्लिम अल्पसंख्यांक बांधवांसमवेत भाजपात प्रवेश

ठाकरे शिवसेनेचे माजी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रज्जाक बटवाले यांचा मुस्लिम अल्पसंख्यांक बांधवांसमवेत भाजपात प्रवेश

*कोकण Express*

*ठाकरे शिवसेनेचे माजी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रज्जाक बटवाले यांचा मुस्लिम अल्पसंख्यांक बांधवांसमवेत भाजपात प्रवेश*

*राणे कुटुंबाने कधीही जात-पात मानली नाही, विकासाचे राजकारण केले;रज्जाक बटवाले*

*कणकवली ः प्रतिनिधी*

उद्धव ठाकरे शिवसेनेचे नांदगाव येथील पदाधिकारी आणि माजी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रज्ज्जाक बटवाले यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.रज्जाक बटवाले यांच्या प्रवेशामुळे ठाकरे शिवसेना, महाविकास आघाडीला फार मोठा धक्का बसलेला आहे. तर कणकवली -देवगड- वैभववाडी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुस्लिम अल्पसंख्यांक समाज भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करू लागला आहे. हे रज्जाक बटवाले यांच्या प्रवेशाने स्पष्ट झाले.
नांदगाव येथे भाजप आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत रज्जाक बटवाले यांचा प्रवेश झाला. यावेळी शिवसेनेचे, श्री.मजीद नावलेकर, मोहीन बोबडे, तस्लिम बोबडे,जुबेर मास्के,सरफराज बट्वाले,अरमान बटवाले,महराज नावळेकर,अकबर बटवाले अशा मुस्लिम अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
या प्रवेशावेळी भाजप पदाधिकारी श्री.पंढरी वायंगणकर,माजी पंचायत समिती सदस्य सौ.हर्षदा वाळके,माजी सरपंच श्रीमती अफ्रोजा नावलेकर,सरपंच पदाचे उमेदवार श्री.भाई मोरजकर,संजय पाटील,नीरज मोरये,राजन मोरजकर,महेश लोके,पंकज आचरेकर,दयानंद हडकर व असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!