*कोकण Express*
*ग्रामपंचायत कर्मचार्यांचे उद्या जिल्हा परिषद समारे लाक्षणिक उपोषण…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथिल तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडुन आपल्या विविध मागण्यांसाठी २८ डीसेंबरला ओरोस येथे जिल्हा परिषद कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला.याबाबतची माहीती सावंतवाडी संघटनेचे अध्यक्ष हनुमान केदार यांनी दिली.
ग्रामपंचायत कर्मचार्यांवर सेवाविषयक झालेल्या अन्याया विरोधात न्याय मिळावा,यासाठी सावंतवाडी संघटनेतर्फे २८ डीसेंबरला सकाळी अकरा वाजल्यापासून हे उपोषण करण्यात येणार आहे.