*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे सेनेला नॉनस्टॉप धक्का थांबेना…!*
*फोंडा घाट- वाघेरी गावच्या १०० शिवसैनिकांचा शाखाप्रमुखासह माजी उपसरपंच, विद्यमान ग्रा.प.सदस्य, उद्योजक, सुप्रसिद्ध भजनी बुवा यांच्यासह भाजपात प्रवेश*
*आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी प्रवेश कर्त्यांचे केले स्वागत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील वाघेरी गावांमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. विरोधकांची जेवढ्या जोरात टीका सुरू आहे त्यापेक्षा जास्त पटीने भाजपमध्ये इनकमिंग देखील सुरू आहे. हे निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला एकसारखे धक्के मिळत आहे. यावेळी सिताराम राजाराम गुरव शिवसेना शाखाप्रमुख, वसंत केशव गुरव माजी उपसरपंच, गीतांजली गणपत गुरव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, गणपत गुरव उद्योजक, चंद्रकांत सिताराम गुरव सुप्रसिद्ध भजनी बुवा, शशिकांत सुतार, योगेश नागप, दिगंबर राणे, रंजन मोंडकर, मिलिंद राणे,बबन कदम,समीर कुवळेकर, अजिंक्य गुरव,अक्षय गुरव, रूजेंद्र राणे दिगंबर गुरव, अविनाश गुरव, श्रीधर गुरव, गणेश गुरव, संजय गुरव, मनोज देवगडकर दीपक गुरव चंद्रकांत गुरव, ऋषिकेश गुरव, किमया सत्यवान गुरव, वैशाली विकास गुरव माजी ग्रामपंचायत सदस्य, ममता गुरव सुचिता गुरव वेदिका गुरव गौरी गुरव मयुरी गुरव स्मिता गुरव अश्विनी गुरव, रुंजी गुरव, लक्ष्मी गुरव,प्रभावती गुरव, दर्शना गुरव, सुहासिनी गुरव सुमित्रा कदम, प्रवेश कर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व विकास कामांच्या बाबत आपण कुठे कमी पडणार नाही याची ग्वाही देखील प्रवेश करताना दिली.
यावेळी उपस्थितीत आमदार नितेश राणे. संतोष राणे विद्यमान सरपंच वाघेरी, सचिन राणे भाजप बुथ अध्यक्ष, महेश पाटील दुग्ध विकास संस्था, सत्यवान गुरव, उमेश खेडकर, प्रणय सावंत, मिलिंद राणे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.