*बांदा ःःप्रतिनिधी* इन्सुलीतील ज्येष्ठ शिवसैनिक कृष्णा सावंत यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन भाजपात प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. सावंत यांच्या भाजप प्रवेशामुळे इन्सुलीत सेनेला जोरदार धक्का बसला आहे. यावेळी माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक सावंत, भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस विकास केरकर, शक्तीकेंद्र प्रमुख नितीन राऊळ, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी, माजी सोसायटी चेअरमन हरिश्चंद्र तारी, ग्रा. पं. सदस्य स्वागत नाटेकर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर राणे आदी उपस्थित होते.
कृष्णा सावंत हे २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेत कार्यरत होते. माजी उपसरपंच, पोलीस पाटील, सोसायटी संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. ते इन्सुलीच्या श्री देवी माऊली देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष आहेत. सावंत यांच्या भाजपा प्रवेशामुळे इन्सुलीत भाजपा आणखी बळकट झाली आहे.
