राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता

राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता

*कोकण Express*

*राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता*

उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे सुमारे ५५ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागांतील औद्योगिक विकासाला चालना देण्याऱ्या उद्योगांबाबत या बैठकीत चर्चा झाली.
मंत्रालयात मंगळवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.देशाच्या व राज्याच्या इलेक्ट्रॉनिक व्हेईकल पॉलिसीनुसार देशातील इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीच्या क्षेत्रातील दहा हजार कोटींची गुंतवणूक असलेला महिंद्रा इलेक्ट्रिक व्हेईकल ऑटोमोबाईल्सचा पहिला प्रकल्प पुणे येथे सुरू होणार आहे. या माध्यमातून राज्यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्पांमध्ये विदेशी गुंतवणूक होणार असून व्होक्सवॅगनबरोबर पुणे इथे तंत्रज्ञान, संशोधन व विकास संदर्भात प्रोटोटाइप बनविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!