नरडवे येथील श्री विठ्ठलादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे गुरुवार दि 1 5 डिसेंबर रोजी जत्रोत्सव

नरडवे येथील श्री विठ्ठलादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे गुरुवार दि 1 5 डिसेंबर रोजी जत्रोत्सव

*कोकण Express*

*नरडवे येथील श्री विठ्ठलादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे गुरुवार दि 1 5 डिसेंबर रोजी जत्रोत्सव*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नरडवे येथील श्री विठ्ठलादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे गुरुवार दि 1 5 डिसेंबर रोजी जत्रोत्सव होणार आहे .
ग्रामदैवत श्री अंबामातेच्या मंदीरा जवळ असलेल्या श्री विठ्ठलादेवी मंदिरात परंपरागत जत्रोत्सव भक्तिपूर्ण वातावरणात साजरा होतो. आकर्षक रोषणाई, देवींच्या पालख्या , माहेरवासिनीची वर्दळ , दशावतार नाटक , सकाळी काला अशा वातावरनात जत्रोत्सवाची मजा व देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक जत्रोत्सवात सहभागी होतात .
श्री विठ्ठलादेवी , श्री कालिकामात आणि श्री पावणादेवी अशा देवींच्या तेजस्वी मूर्ती मंदिरात विराजमान आहेत . जत्रोत्सवानिमित्त या मूर्ती अलंकृत केल्या जातात . गेले आठवडाभर ग्रामस्थ मंदिर परिसर साफसफाई , सुशोभीकर यात सहभागी होत जत्रेची तयारी करीत आहेत . उत्सवाच्या निमित्ताने माहेरवाशिणी मोठ्या प्रमाणावर गावी येतात . शिवाय चाकरमान्यांची वर्दळही वाढलेली असते . मंदिराभोवती आकर्षक रोषणाई , विविधांगी दुकान आणि भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर गजबजलेला असतो .
रात्रौ ग्रामदैवत श्री अंबामातेच्या मंदिरातुन वाजत गाजत देवींच्या पालख्या बाहेर पडतात . फटाक्यांची आतिषबाजी आणि भाविकांनी पावले धरत घातलेला फेर अशा स्वरूपात पालखी श्री विठ्ठलादेवी मंदिराला प्रदक्षिणा घालते आणि मंदिरात विसावते . रात्रौ वालावलकर दशावतारी मंडळाचे नाटक होते . मंडळातील दिग्ग्ज कलाकारांची अदाकारी पाहण्यासाठी नाट्यरसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात . सकाळी काल्या नंतर जत्रोत्सवाची सांगता होते .
भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नरडवे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!