*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपची लाट वैभववाडी तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे ५ ग्रामपंचायत सरपंच व ७० सदस्य बिनविरोध निवड*
*आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी भाजप कार्यालयात येऊन केला सत्कार*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तेथील जनतेने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कामाच्या पद्धतीवर विश्वास ठेवून ५ ग्रामपंचायत सरपंच व 70 सदस्य बिनविरोध निवडून दिले. वैभववाडी मध्ये भाजप कार्यालयात येऊन जांभवडे सरपंच मानसी पवार, उपळे सरपंच दक्षता पालांडे, तिथवली सरपंच प्रियांका हरयाण, अरुळे सरपंच मानसी रावराणे, निमअरुळे सरपंच सज्जन माईनकर, व सदस्य अनंत रांबाडे,अस्मिता पालांडे, स्वप्नाली हातनकर, नवनाथ पालांडे, पूजा वाडेकर, समिता कदम, अनिल गुरव, अनिता गोसावी, वैष्णवी सकपाळ, मनोहर गावडे मिताली हडशी,प्रताप पालांडे,नितीन जाधव, राजश्री उपडे, चंद्रकांत पाष्टे, सुप्रिया मंचेकर, ओमकार हरयाण, सुरेश हरयाण, कामिनी कदम, रत्नप्रभा रावराणे, कामिनी कदम, रमेश वारंग, मारुती सोनार, क्रांती कर्पे, भिकाजी सुतार, सुप्रिया नारकर, अशोक अंगवलकर, प्रमिला कदम, सायली सावंत, अविनाश इस्वलकर, संजय कदम, यांचे आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व आभार मानले. व कामांच्या बाबत आपण कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही सर्व सरपंच व सदस्यांना दिली.