*कोकण Express*
*नागवे महिला सरपंच पदाच्या उमेदवार बाळासाहेबांची शिवसेनेत ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत केला प्रवेश*
*तालुका समन्वयक सुनील पारकर, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली केला पक्षप्रवेश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यपदाच्या मतदानाला अवघे 5 दिवस शिल्लक असतानाच नागवे सरपंच पदाच्या अपक्ष उमेदवार सायली संतोष जाधव यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.माजी खा.ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते सायली जाधव यांनी भगवा झेंडा हाती घेतला. हा पक्षप्रवेश कणकवली तालुका समन्वयक सुनील पारकर यांच्या माध्यमातून उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी महिंद्र सावंत, सुनील पारकर, प्रशांत सांगवेकर आदी उपस्थित होते.