आ.नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच मतदारांना धमकी – आ.वैभव नाईक

आ.नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच मतदारांना धमकी – आ.वैभव नाईक

*कोकण Express*

*आ.नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच मतदारांना धमकी – आ.वैभव नाईक..*

*सिंधुदुर्गात शिवसेना व वंचित बहुजन आघाडीची ग्रामपंचायत निवडणूकीत युतीची घोषणा..*

कणकवली दि.१३ डिसेंबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२५ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत.या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती करण्यात येत आहे. भाजपला रोखण्यासाठी दोन्ही पक्षांचे उमेदवार विजयी करण्याठी एकत्रित मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेचे पॅनेल उभे राहिल्यामुळे भाजपाची अडचण निर्माण झाली आहे.कणकवली विधानसभा मतदारसंघातही अनेक गावांमध्ये शिवसेनेची पॅनल लढत आहेत, शिवसैनिक लढत आहेत. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते भर सभांमध्ये मतदारांना दमदाटी करत असल्याचा आरोप शिवसेना आमदार जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली.

कणकवली येथील विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनेते गौरीशंकर खोत शिवसेना नेते सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, महिला आघाडी प्रमुख उर्वी साटम, कणकवली तालुका अध्यक्ष संजय जाधव, मालवण तालुकाध्यक्ष अक्षय कदम, युवा आघाडी प्रमुख रोहन कदम आदींसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आ.वैभव नाईक म्हणाले,वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना आघाडी जिल्ह्यात झाली आहे.त्यामुळे जिल्ह्यात होत असलेल्या ३२५ ग्रामपंचायत निवडणुका आहेत.भाजपा विरोधात २९० ठिकाणी थेट लढत होत आहे.आमच्या पाठीशी वंचितची ताकद आहे. राज्यातील सत्ताही केवळ कोर्टाच्या निकालावर आहे कोणत्या दिशेने सरकार कोसू शकेल जी केंद्रात सत्ता आहे.त्यात नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात किती उद्योग आणले? ग्रामपंचायत मध्ये सत्ता असलेल्या लोकांनी आतापर्यंत काय विकास केला हे जनतेने विचारण्याची गरज आहे.भाजपच्या माध्यमातून निधी नाही.भाजपा कडून काही ठिकाणी अर्ज बाद करण्याचा प्रयत्न झाला आहे.नितेश राणे धमक्या देण्याचा प्रयत्न करत आहेत.लोक धमक्यांना भीक घालणार नाही.शिवसेना जिल्ह्यात काम करेल.जिल्हापरिषद मधील स्वफंडातील ९ लाखांची बिले काम न करताच काढण्यात आली आहेत.त्या अधिकाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. जिल्हा परिषद मध्ये ही भारतीय जनता पार्टीचे लोक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा टोला वैभव नाईक यांनी लगावला आहे.तसेच सगळ्या निवडणुका आम्ही ताकदीने लढणार आहोत,असा इशारा त्यांनी दिला.

वंचितचे जिल्हाध्यक्ष म्हणाले,जातीवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी आमचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.काही लोक चुकीचे वक्तव्य करत आहेत.पुरोगामी विचारांचा जिल्हा असल्याने नाव बदनाम केलं जात आहे.थेट सरपंच आणि सदस्य निवडून आणण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत राहणार आहे.ज्या महामनावाची बदनामी बीजेपी मधील अमराठी माणसे आणि राज्यपाल व चंद्रकांत पाटील यांनी केलं त्यांचा आम्ही निषेध करतो.आमचे जिल्ह्यात वंचित १२ सरपंच पदाचे उमेदवार आणि १०० पेक्षा सदस्य पदाचे उमेदवार रिंगणात आहे.

उपनेते गौरीशंकर खोत म्हणाले,भारतात लोकशाहीला भाजपाने धोका पोहचवला आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आंबेडकर यांनी समाजातील सर्व पक्षांना सोबत घेणं आवश्यक आहे,असे म्हटले आहे.भाजपला पराभूत करण्यासाठी जात,पात,धर्म बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे.नितेश राणे यांचे वक्तव्य हे धमकीचे आहे. नांदगाव मध्ये माझ्या विचाराचा सरपंच आला नसल्या तर एक रुपयांचा निधी देणार नाही.२५ वर्षे ती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद नारायण राणे यांचेकडे सत्ता होती.मग आता तुम्हाला जागा आली का? निधी मिळावण्याचा आमचा अधिकार आहे.कोण घरातून निधी देत नाही.आमच्या करातून निधी येतो.धमक्यांना कोणीही घाबरु नका.राणे विचारांची बीजेपी जिल्ह्यात राहता गाम नये.

शिवसेना नेते सतीश सावंत म्हणाले,नितेश राणे वक्तव्य करतात,ही दादागिरी आहे.या मतदरसंघातील लोकांना विकासापासून वंचित ठेवल्यामुळे आता दादागिरी करावी लागत आहे.तसेच जिल्हा बँकेचा वापर निवडणुकीसाठी करावा लागत आहेत.एका गावात २०-२० लोकांना पत्र द्यावी लागत आहेत.या निकालानंतर नितेश राणेंचे वर्चस्व कमी झाल्याशिवाय रहाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!