*कोकण Express*
*राठीवडेचे माजी सरपंच संतोष धुरी ठाकरे गट शिवसेनेत…*
*आमदार वैभव नाईक यांनी केले स्वागत*
*मालवण ः प्रतिनिधी*
तालुक्यातील राठीवडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष धुरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नाईक यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, बंडू चव्हाण, सुभाष धुरी, मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर यांच्यासह राठीवडे येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.