*कोकण Express*
*बॅ नाथ पै नर्सिंग महाविद्यालयामध्ये कुकरी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक उपक्रम संपन्न*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या ए एन एम, जी एन एम आणि बी.एस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमामध्ये आहारशास्त्र हा विषय अभ्यासासाठी आहे व या विषयांमध्ये आरोग्यवर्धक पाककृती करण्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक उपक्रम राबविले जातात.
समतोल आहार ही आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे .आरोग्य संवर्धन ,आजारांचा प्रतिबंध, आजार बरा होण्यासाठी व आजारानंतर रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सकस अन्न महत्त्वाचे आहे .
रुग्णांसाठी आवश्यक असलेले अन्नपदार्थ कसे बनवावेत? कोणते व किती साहित्य वापरावे ?प्रत्येक साहित्यामध्ये कोणते अन्नघटक किती प्रमाणात असतात? हे सर्व या प्रात्यक्षिकांमध्ये शिकवले जाते.यातील काही निवडक पदार्थ शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना करून दाखवले आणि विद्यार्थ्याकडून पुन्हा तयार करून घेतले.अशाप्रकारे आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. कु.वैजयंती नर आणि त्यांच्या समवेत प्रा.प्रियांका माळकर ,प्रा.नेहा महाले,प्रा. ऋग्वेदा राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक यशस्वीपणे पार पाडले .
या प्रात्यक्षिक कार्यक्रमांमध्ये विविध पाककृती यांचा स्वाद घेत त्यांच्या उत्तम आयोजनाबद्दल व उत्तम पाककलेबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मीना जोशी, उमेश गाळवणकर, वैशाली ओठवणेकर,सुमन करंगळे-सावंत, शांभवी आजगावकर-मार्गी व इतर प्राध्यापक वृंदा यांनी या प्रात्यक्षिक उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत.शुभेच्छा दिल्या