*कोकण Express*
दीपक केसरकर; त्यांच्या विधानाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये…
*मुंबई*
नितेश राणेंनी केलेल्या “त्या” वक्तव्याला धमकी म्हणता येणार नाही. आपण एखाद्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना हक्काने लोकांना सांगतो. त्यामुळे त्याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मतदारसंघातील लोक आपल्यावर प्रेम करत असतात. आपण विकास कामासाठी निधी देत असतो. त्यामुळे ते हक्काने तसे बोलले असावे. त्यामुळे त्याचा गैर अर्थ काढण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.
श्री केसरकर हे मुंबई येथे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. नांदगाव येथे झालेल्या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी आपल्या माध्यमातून देण्यात आलेल्या उमेदवाराला निधी द्या, अन्यथा मी आमदार निधी देणार नाही, असे सांगितले होते. याबाबत केसरकारांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.