शिरगाव महाविद्यालयात वळण्याच्या वाटेवर कार्यक्रम

शिरगाव महाविद्यालयात वळण्याच्या वाटेवर कार्यक्रम

 *कोकण Express*

*शिरगाव महाविद्यालयात वळण्याच्या वाटेवर कार्यक्रम*

 *करिअर कट्टा व स्पर्धा परीक्षा विभागाचे आयोजन*

*कासार्डे : संजय भोसले*

शिरगाव शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगाव येथे करिअर कट्टा व स्पर्धा परीक्षा विभागातर्फे आयोजित “वळणाच्या वाटेवर” हा मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उपस्थित प्रमुख वक्ते, तिमिरातून तेजाकडे संकल्पनाचे प्रमुख, मुंबई सीमाशुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवाद सत्यवान रेडकर यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअर विषयक मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, शिरगाव हायस्कूल शिरगाव, कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शमशुद्दिन अत्तार, ज्युनिअर शिक्षक श्रीम. राणे, श्री. खरात, महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्राध्यापिका सिद्धी कदम, प्राध्यापक वर्ग मिलिंद कदम, शेखर गवस, सुगंधा पवार, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे संयुक्त विद्यार्थी संख्या उपस्थित होते.                 यावेळी मार्गदर्शन करताना सत्यवान रेडकर म्हणाले की, जीवनात यश अपयशाला महत्त्व नसून ध्येय हेच अंतिम ठेवा. ध्येयपूर्तीसाठी अपार कष्ट व मेहनत महत्त्वाची आहे. बुद्धीची तलवार कष्टाने पाजळीत रहा म्हणजे ती धारदार बनत राहील व तुमचे नाव रोशन होईल. यावेळी रेडकर यांनी आपल्या आयुष्यातील नापासचा किस्सा सांगितला. व या शापातून बाहेर पडताना कशाप्रकारे यशाला गवसणी घातली. तारुण्यात प्रेमाचे अनेक पुष्पगुच्छ आले पण ती नाकारल्याने आज समाजाकडून मिळणारी पुष्पे लाख मोलाची असल्याचे सांगितले. मानव जन्म एकदाच मिळतो त्याचे सार्थक ध्येयपूर्तीने करा. त्याचप्रमाणे MPSC,UPSC, IPS,IBPS या केंद्र व राज्य व विविध स्पर्धा परीक्षांची माहिती, त्या परीक्षेसाठी नेमकी कोणते पुस्तके अभ्यासावे? असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी रेडकर यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार करिअर कट्टा आणि स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापिका विशाखा साटम यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!